राजुरा (जि. चंद्रपूर) : राजूरा चंद्रपूर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर रेल्वे विभागामार्फत डागडुजीचे काम करण्यात येत असल्यामुळे आज दिनांक 25 फेब्रुवारीला सकाळी आठ वाजल्यापासून वाहतुकीसाठी महामार्ग बंद करण्यात आला. आणि उड्डाणपुलाला लागून असलेला जुना मार्ग प्रवासासाठी खुला करण्यात आला मात्र या मार्गावर प्रचंड प्रमाणात फ्लाय एश पसरली असल्यामुळे वाहनांची वर्दळ सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन ते तीन फुटावर येईल वाहने दिसणे कठीण झाले .प्रचंड प्रमाणात धूळ तयार झाली यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. वळती केलेल्या मार्गावर रेल्वे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने धुळीच्या नियंत्रणासाठी आरोग्याच्या दृष्टीने पाणी शिंपडले नव्हते त्यामुळे धुळीच्या प्रदूषणात नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजी पणा मुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला..