मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया पेजवर काहीशा मनोरंजनात्मक पोस्टद्वारे सामाजिक संदेश आढळतो. हे संदेश केवळ सामाजिकच नसतात तर कलात्मक आणि तितकेच मनोरंजकही असतात. सध्या कोरोना व्हायरस संकटाचा काळ आहे. अशा काळात मुंबई पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन संदेश दिला आहे. हा संदेश देताना अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथ चित्रपटातील एका दृश्याचा वापर करण्यात आला आहे.