चाकण येथील मुख्य चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर दोघांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यानं पोलीस कर्मचारी जागीच बेशुद्ध पडला. रॉड लागल्यानं कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कंटेनर मागे घेण्याच्या वादातून दोघांनी हा प्राणघातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे.
#CCTVFootage #CRIME #CrimeNews #pimprichinwad