फोर्टमधल्या काळाघोडा परिसरात काही अत्यंत महत्त्वाच्या वास्तू आहेत. त्यात एक आहे आताचं पंजाब ग्रिल रेस्टॉरंट व संगीतप्रेमींचं श्रद्धास्थान असलेलं रिदम हाऊस. पंजाब ग्रिल हे आताचं नाव आहे, आधी इथं होतं वेसाइड इन. या वेसाइड इनमध्ये बसून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेचा मसुदा लिहिला. या वेसाइड इनची व रिदम हाऊसची माहिती सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #Mumbai #Fort #KnowYourCity #KYCMumbai