पुणेकरांसाठी दिलासादायक वृत्त; घरच्या गाडीतून सहकुटुंब प्रवास करताना मास्कची गरज नाही

2021-01-22 373

कुटुंबियांसोबत चारचाकी वाहनात पुणे महापालिका हद्दीतून प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची आवश्यकता नसेल अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. मात्र त्याचवेळी ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातीलच असाव्यात अशा अटी बंधनकारक असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केलं आहे.

#Pune #Covid19 #FaceMask #Coronavirus