ऑस्ट्रेलियाला नमवणाऱ्या अजिंक्य रहाणेचं मुंबईत जंगी स्वागत

2021-01-21 540

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ३२ वर्षांपासून अजिंक्य असलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताच्या अजिंक्यने धूळ चारली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिका २-१ अशी जिंकत पराक्रम केला. त्यानंतर अजिंक्य भारतात परतल्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशाचा गजर आणि रेड कार्पेट अशा थाटात त्याचे सर्वांनी स्वागत केले.

Videos similaires