निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रश्न सोडवायचे नसतात - अजित पवार

2021-01-08 301

राज्य सरकारने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गुंठेवारीचा निर्णय घेतला गेला असल्याचा आरोप होत आहे. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, "महापालिका निवडणुकीला एक वर्ष आहे. त्यामुळे कुठले पण निर्णय घेतले म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच घेतले असं होत नाही. तसंच राज्य सरकार चालवत असताना त्यावेळी जे प्रश्न येत असतात तेव्हा निर्णय घ्यावे लागतात".