देशात कोरोना लसीकरण कधी सुरु होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र त्या आधी महाराष्ट्रात ड्राय रन घेण्यात येणार आहे. 8 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबविण्यात येणार आहे.