राज्याचे माजी सहकारमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील उंडाळकर यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. विलासकाकांनी १९६२ मध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी सलग ३५ वर्षे प्रतिनिधित्व केलं.