महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी (MPSC)ने परीक्षांच्या संदर्भात महत्वाचा बदल केला आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांची परीक्षेला बसण्याची मर्यादा निश्चित केली आहे. या संदर्भात एमपीएससीने एक पत्रकही काढलं आहे. नव्या नियमानुसार, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जास्तीत जास्त सहा वेळा परीक्षा देता येणार आहे.