भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशात राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. आजचा दिवस म्हणजेच 23 डिसेंबर हा राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. अटल बिहारी वाजापेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस \'राष्ट्रीय शेतकरी दिन\' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.