नाशिक जिल्ह्यात शिवसेना पक्षाला काहीसा धक्का बसला आहे. शिवसेना पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी धनुष्य बाणाला \'जय महाराष्ट्र\' करत भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सानप यांचा भाजप प्रवेश झाला.