पिंपरीत महिला पोलीस लाच घेतानाची घटना कॅमेऱ्यात कैद

2020-12-17 5,823

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील अवैध धंदे हद्दपार झाल्याचं दिसत आहे. यासाठी सामाजिक सुरक्षा पथक ही तयार करण्यात आलं. असं असताना पोलीस मात्र लाच घेत असल्याचा प्रकार एका व्हिडिओद्वारे समोर आला आहे. पिंपरीतील वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचारी या वाहतूक पोलीस अधिकारी जवळ असताना त्यांची नजर चुकवून लाच घेत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.