देव दिवाळी आणि देव दिपावली यात कधीच गल्लत करू नका. देव दिवाळी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. आणि देव दिपावली हा खंडोबाच्या देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली किंवा मोठी दिवाळी. या दिवशी खंडोबाच्या (मल्हारी मार्तंडाच्या) देवळात दीपोत्सव करतात.