यंदाच्या दिवाळीच्या वेळापत्रकानुसार 16 नोव्हेंबर रोजी भाऊबीजेचा मुहूर्त आहे. बहीण भावाच्या नात्याची गाठ आणखीनच घट्ट करणारा हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. काही वेळेस शिक्षण किंवा कामानिमित्त एकमेकांपासून दूर राहणाऱ्या भावंडाना एकत्र भेटण्यासाठी हा सण निमित्त सुद्धा देऊन जातो.