पुण्यामध्ये स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रोच्या मार्गाचे खोदकाम सुरु आहे. याच खोदकामादरम्यान मंडई परिसरामध्ये अज्ञात प्राण्याचे प्रचंड मोठ्या आकाराचे अवशेष आढळून आले आहे. चाचण्या आणि संशोधनानंतर या अवशेषांचा काळ शोधता आल्यास यापूर्वी पुण्याचा कधीच समोर न आलेल्या पुरातन इतिहासावर प्रकाश टाकणे शक्य होणार आहे.