मालाबार 2020 म्हणजेच चार देशांच्या नौदलाच्या युद्ध नौकांच्या एकत्रित युद्ध सरावाचा पहिला टप्पा बंगालच्या खाडीत 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान पार पडला होता. दुसरा टप्पा 17 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. तो 20 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. यादरम्यान हिंदुस्थान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जापानचे नौदल कठीण आणि अत्यंत जटिल (क्लिष्ट) आव्हानांना सामोरे जाण्याचा एकत्र अभ्यास करत आहेत. यामध्ये हिंदुस्थानच्या नौदलाची विमानवाहू युद्धनौका विक्रमादित्य, अमेरिकी एअरक्राफ्ट करियर निमित्त सहभागी होत आहेत. या शिवाय जापान आणि ऑस्ट्रेलियाच्याही विमानवाहू युद्धनौका देखील सहभागी झाल्या आहेत. युद्धाभ्यासात पाणबुडी वॉरफेअर सोबतच प्रत्यक्ष फायरिंगचा अभ्यास देखील करत आहेत.