शालेय शुकासाठी जबरदस्ती कराल तर याद राखा! - सीमा सावळे यांचा इशारा...

2020-06-16 4

कोरोना लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र पगार कपात, नोकरी कपात जोरात सुरू असताना अशा अत्यंत बिकट परिस्थितीत बहुसंख्य पालक आर्थिक अडचणीत आहेत आणि दुसऱ्या बाजुला शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी सक्ती सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे शुल्क भरत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचे निकाल आडवूण ठेवण्याचा आडमुठेपणा काही शैक्षणिक संस्था चालकांकडून सुरू आहे. किमान परिस्थितीचे भान बाळगून संस्थाचालकांनी शैत्रणिक शुल्क वसुलीसाठी मुदत द्यायला पाहिजे. कोणत्याही स्थितीत वार्षिक परिक्षांचे निकाल अडवून ठेवता येत नाही, याची नोंद घ्यावी. जर कोणी पालकांना त्रास देत असतील तर अशा संस्था चालकांच्या विरोधात नाविलाजास्तव आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही भाजपच्या जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी दिला आहे.

Videos similaires