अशरफ गनी यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथग्रहण कार्यक्रमात बॉम्बस्फोट

2020-03-09 403

काबुल- अफगानिस्तानात राजकीय संकट आले आहे सोमवारी अशरफ गनी यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली त्यांच्या शपथग्रहण कार्यक्रमात अनेक बॉम्बस्फोट झाले, यात कोणातीही जीवितहानी झालेली नाही यातच गनी यांचे राजकीय प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनीदेखील स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले आहे अब्दुल्ला अब्दुल्ला अफगानिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत यातच अमेरिकेचे विशेष राजदूत जालम खलीलजाद दोन्ही नेत्यांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत 18 फेब्रुवारीला लागलेल्या निवडणुकीच्या निकालात अशरफ गनी यांचा विजय झाला, पण अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी मतमोजनीत गडबड असल्याचा आरोप केला