ऑटो डेस्क- चीनी कंपनी ग्रेट वॉल मोटर्सने ऑटो एक्सपो 2020 मध्ये GWM R1 ही इलेक्ट्रिक कार सादर केली कंपनी पुढील वर्षापर्यंत ही कार भारतीय बाजारात लॉन्च करू शकते आपल्या कॉम्पॅक्ट लुक आणि कलर कॉम्बिनेशनमुळे चर्चेचा विषय ठरली आहे कारची रेंज सिंगल चार्जिंगमध्ये 350 किलोमीटर आहे स्टँडर्ड चार्जरने या कारला घरीच चार्ज करू शकता स्टँडर्ड चार्जरने चार्ज होण्यास 10 तास वेळ लागतो सध्या शो मध्ये कंपनीने कारचे इंटरनॅशनल मॉडल सादर केले आहे, ज्यामध्ये लेफ्ट साइड ड्रायव्हिंग स्टाइल दिले होते सध्या कंपनीने याची लॉन्चिंग तारीख आणि किमतीविषयी कोणतीही घोषणा केलेली नाही चीनमध्ये कारची किंमत अंदाजे 8 लाख रुपये आहे भारतातही याच किमतीत कार उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे