औरंगाबाद - देशभर विविध ठिकाणी नागरिकत्व कायदा आणि एनआरसीचा विरोध केला जात असताना त्याचे पडसाद औरंगाबादेतही उमटले गेल्या काही दिवसांपासून एसएफआय आणि इतर विद्यार्थी संघटनांची येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती (सीएए) कायद्याविरुद्ध निदर्शने सुरू आहेत त्यात गुरुवारी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात येऊन कायद्याच्या समर्थनात मोर्चा काढला याचवेळी एसएफआय आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते समोरा-समोर आले परंतु, घटनास्थळी पोलिस बंदोबस्त असल्याने मोठा वाद टळला