धबधब्याच्या पाण्यात हत्तींचा अख्खा कळप गेला वाहून, 6 मृत्यूमुखी

2019-10-07 516

बँकॉक - हत्ती खरोखर किती संवेदनशील आणि सामाजिक प्राणी असतो याची एक करुण घटना समोर आली आहे थायलंडच्या खाओ याई नॅशनल पार्कच्या हायू नारोक धबधब्यात वाहून 6 हत्तींचा मृत्यू झाला आहे पार्कच्या कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनेतून 2 हत्तींना बाहेरही काढले प्रशासनाच्या माहितीप्रमाणे, दोन्ही हत्ती मृत पिल्लूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते या धबधब्याला नरकाचा खड्डा असेही म्हटले जाते दरम्यान, वाचवण्यात आलेल्या हत्तींवर एक आठवडा नजर ठेवली जाणार आहे सोबतच, हा धबधबा पर्यटाकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे