हायकोर्टाचा निकाल येताच शुक्रवारी रात्री उशीरा आरे कॉलनीतील वृक्षांची कत्तल सुरू करण्यात आली यावर संतप्त आंदोलकांनी परिसराला घेराव टाकण्याचा प्रयत्न केला परंतु, मेट्रो रेल्वे साइटवर कलम 144 लागू करण्यात आले आहे तरीही या ठिकाणी होणारी गर्दी कमी झालेली नाही यानंतर शनिवारी सकाळी आंदोलकांपैकीच एक शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे