टिक टॉक व्हिडीओ बनवण्याच्या नादात तरुणाचा जीव गेला

2019-09-24 303

निझामाबाद तेलंगणा - टिक टॉक व्हिडीओ बनवण्याच्या नादात तरुणाला आपला जीव गमवावा लागला 23 वर्षीय दिनेश मित्रांसोबत निझामाबाद येथे नदीवर गेला होता, तेथे टिक टॉक व्हिडिओ बनवण्यासाठी नदीमध्ये उतरला परंतु पाण्याच्या प्रवाहामुळे त्याचा पाय घसरला 48 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना त्याचा मृतदेह मिळाला दिनेशला नुकताच दुबईत जॉब लागला होता