महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण व धर्मकारणाचे अभ्यासक, भाष्यकार, संशोधक आणि विचारवंत असलेले डॉ सदानंद मोरे यांचा जन्म तुकाराम महाराजांच्या वंशात झाला. एस पी कॉलेज मधून तत्वज्ञान विषयात एम ए पदवी संपादन केली असून १९८२ मध्ये पुणे विद्यापीठाची तत्वज्ञान विषयात पीएचडी पूर्ण केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता गीता- कर्माची उपपत्ती. या प्रबंधाला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला. राजकारण, समाजकारण, धर्मकारण विषयक विविध विषयावरील लेखन, व्याख्याने, चर्चासत्रात यात सहभाग देत यांना अनेक पुरस्कार मिळाले.