मालेगाव महापालिका त्रिशंकू,कांग्रेसला सर्वाधिक जागा

2017-05-27 139

महापाैर हाजी माेहंमद इब्राहीम पराभुत
मालेगाव-महापालिकेच्या चाैथ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८३ जागांसाठी बुधवारी(दि.२४)घेण्यात मतदानानंतर शुक्रवारी (दि .२६) सात ठिकाणी मतमाेजणी करण्यात अाली.प्रमुख दावेदार पाच पक्षांपैकी काेणालाही बहुमता इतक्या जागा मिळवता अाल्या नाहीत.त्यामुळे सभागृहाची स्थिती त्रिशंकु झाली अाहे.विद्यमान महापाैर हाजी माेहंमद इब्राहीम पराभुत झाले अाहेत.
शहराितल जाखाेट्या भवन, तालुका क्रिडा संकुल,शिवाजी जिमखाना व माेतिबाग नाका या भागाितल कृष्णा लाॅन्स या ठिकाणी सात निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मतमाेजणी करण्यात अाली.८३ जागांसाठी ३७३ उमेदवार मैदानात हाेते.सकाळी १० वाजता मतमाेजणीला सुरवात झाली.या प्रसंगी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मतमाेजणी केंद्रांवर गर्दी करुन हाेते.मतमाेजणी केंद्रांभाेवती स्थािनक पाेलिस व राज्यराखीव पाेलिस दलाचा बंदाेबस्त लावण्यात अाला हाेता.त्यामुळे ज्या प्रतिनिधींकडे निवडणूक शाखेचे अाेळखपत्र हाेते, त्यांनाच अात साेडण्यात येत हाेते.सकाळी ११ पासुन निकाल हाती येण्यास प्रारंभ झाला.दुपारी २ वाजे प र्येंत सर्व निकाल घाेषित झाले.येथील अाैद्याेेगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाहेर सर्वाधिक गर्दी पाहयला मिळाली.कार्यकर्त्यांनी या ठिकाणी फटाके व गुलाल अाधिच अाणुन ठेवला हाेता.ज्या दाेन उमेदवारांमच्या मतांमध्ये दाेन अाकडी संख्येचे अंतर हाेते,त्या जागा उत्कंठा वाढविणाऱ्या ठरल्या.
निवडणूक अधिकारी तथा मतमाेजणी केंद्राध्यक्ष यांच्याकडुन विजयी उमेदवारांची नावे घाेषित हाेण्यापुर्वीच उमेदवारांच्या प्रतिनिधींनकडुन मतदान यंत्र
निहाय अाकडे संकलित झाल्याने केंद्रांबाहेर विजयी उमेदवारांयच्या समर्थकांकडुन जल्लाेष पाहायला मिळत हाेताे.

Videos similaires